Advertisement
अर्थकारणजळगावनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

भुसावळात ‘नगरसेवक’ पदासाठी निवडणूक लढवण्यास अनेक बांधकाम कामगार इच्छुक, कागदपत्रांची ‘जमवाजमवी’ सुरू

बंडखोरीमुळे 'काटाफाईट' होण्याची शक्यता !

भुसावळ – 13/11/2025, भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक लागल्यापासून मतदारांसह इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलेला असून, त्यातून रंजक घटना समोर आलेल्या आहे. भुसावळ नगरपालिकेचा नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केलेली असून, राष्ट्रीय पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी काही उमेदवारांनी केलेली आहे. मात्र नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाचा ऑनलाइन अर्ज दाखल करताना सोबत जोडावयाची विविध प्रकारची कागदपत्रे आणि आवश्यक असलेली निवडणूक आयोगाच्या नियमावलीची माहिती इच्छुक उमेदवारांना नसल्याने त्यांची अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मोठी दमछाक बघायला मिळालेली आहे. कंत्राटदार नसल्याचे ना हरकत, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, थकबाकीदार नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र,संपत्तीचे विवरण , कर्जाची माहिती, यासारखी आणखी काही इत्यंभूत माहिती सादर करावी लागणार आहे. खोटी व अपूर्ण माहिती देणाऱ्या आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
बांधकाम कामगार निवडणुकीच्या मैदानात ?
भुसावळ शहरात गेल्यावर शहरापासून महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या योजनेच्या भांड्यांच्या संचाचा लाभ मिळण्यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. यातील अर्ज मंजूर झालेल्या हजारो बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संचाचा लाभ देखील मिळालेला आहे. दरम्यान , गेल्या आठवड्याभरापासून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेल्या आणि लाभ घेतलेल्या २० ते २५ लाभार्थी कामगारांनी नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केलेली असून, निवडणुकीचा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना त्यांची मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले आहे. तर काही ठिकाणी बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यासंदर्भात लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमवी करताना दिसून आले आहे. शासनाच्या भांडी संचाचा लाभ घेणारे काही लाभार्थी सध्या बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे बेरोजगार असल्याने त्यांनी, “आम्हाला आमच्या वार्डातील मतदारांचा पाठिंबा असून नगरसेवक होऊन जनसेवा करण्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी या निवडणुकीत नशीब आजमावत आहोत” अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. भुसावळसह जिल्ह्यातील निवडणूक लढविणाऱ्या बांधकाम कामगारांची तथा लाभार्थींची माहिती लवकरच आम्ही नावानिशी प्रकाशित करणार आहोत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp