Advertisement
जळगावमहाराष्ट्र

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन, व्याघ्रप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण

जळगाव , दि. ७ जानेवारी यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये काल ६ रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती.

मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल. अशी माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली‌ आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp