उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला, मात्र उमेदवारी का मिळाली नाही ? हे आहे कारण
उन्मेश पाटील चाळीसगाव विधानसभा लढवणार ?
मुंबई दि:३ एप्रिल, भाजपने तिकीट कापल्यानं नाराज झालेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. मंगळवारी उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उन्मेष पाटील यांचा प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप कडून उमेदवारी न मिळाल्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.परंतु उद्धव ठाकरेंकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उन्मेश पाटील यांनी सांगितले आहे की, मला
राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांची कामे देखील केली पाहिजे.मी भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती. पण मला अचानक २०१९ मध्ये लोकसभा उमेदवारी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत ४ लाख मतांनी मी निवडून आलेलो होतो. मी प्रत्येक काम प्रामाणिकपणे पूर्ण केले.मात्र जाणीवपूर्वक झारीतल्या शुक्राचार्यांनी मला डावलण्याचे काम केले. आज शुभ दिन आहे, आम्हाला शिवबंधन बांधले आहे. आम्हाला गढूळ राजकारण करायचे नाही आहे, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली.
आज अनेक जण प्रश्न विचारताय, उमेदवारी मला मिळाली नाही म्हणून प्रवेश करताय का? मी लोकांचे काम करता येईल म्हणून राजकारणात आलोय. दुर्दैवाने विकासाची किंमत नाही. युतीने मला मतं दिली. एका भावाने धोका दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्या पाठीशी आहे. मला बदल्याचं राजकारण नको, बदलायचं राजकारण हवं आहे. काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिक काम केलं’ असं म्हणत पाटील यांनी भाजपमधील झालेली घुसमट बोलून दाखवली.
उन्मेश पाटील हे चाळीसगाव विधानसभा लढणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.