जळगाव : बोगस शालार्थ आयडी घोटाळा-1100 शिक्षक चौकशीच्या रडारवर; SIT मंगळवारी दाखल होण्याची शक्यता
जिल्ह्यातील बोगस शिक्षकांसह संस्थाचालकांचे धाबे दाणाणले

जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणाऱ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात आता मोठी कारवाई होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुमारे 1100 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (SIT) मंगळवारी जळगावात दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
🔴 घोटाळ्याचे स्वरूप : 150 कोटींचा फटका
2012 च्या बनावट शासन निर्णयाच्या (GR) आधारे शालार्थ प्रणालीमध्ये बोगस आयडी तयार करण्यात आले. नियमबाह्य पद्धतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करून शासनाची तब्बल 150 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचे प्राथमिक निष्कर्ष.
893 शिक्षकांची माहिती मिसमॅच असल्याचे समोर.
बॅकडेटेड नियुक्त्या दाखवून वेतन उचलल्याचा आरोप.
🔴 मोठी साखळी उघडकीस
या घोटाळ्यात केवळ शिक्षकच नव्हे तर, संस्थाचालक,मुख्याध्यापक ,वेतन अधीक्षक शिक्षणाधिकारी / उपसंचालक,मंत्रालयातील काही अधिकारी यांचा संगनमताने सहभाग असल्याचे प्राथमिक पुरावे सूचित करतात.
🔴 SIT ची स्थापना व रचना
राज्य शासनाने गंभीर दखल घेत विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन केले आहे:
चंद्रकांत पुलकुंडवार (IAS) – विभागीय आयुक्त, पुणे (पथक प्रमुख)
मनोज शर्मा (IPS) – पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था)
हारुन आतार – सहसंचालक, शिक्षण आयुक्तालय (सदस्य सचिव)
🔴 चौकशीची कार्यकक्षा अशी
SIT खालील बाबींची तपासणी करणार:
शालार्थ मान्यता व वैयक्तिक मान्यता प्रक्रियेची छाननी
सेवासातत्य व नियुक्त्यांची पडताळणी
विना-अनुदानित ते अनुदानित पदांवरील बदल्या
2012 पासून आजपर्यंतच्या सर्व प्रकरणांचा तपास
व्यवस्थेतील त्रुटींवर सुधारणा सुचविणे
अहवाल 3 महिन्यांत सादर करणे बंधनकारक
🔴 जळगाव जिल्ह्यातील संस्थानिहाय धक्कादायक आकडे काही मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदी आढळल्या:
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी – 177
धनदाई माता शिक्षण मंडळ, अमळनेर – 34
तुळजाई शिक्षण मंडळ, पाचोरा – 29
ग्रामीण विकास तरुण मित्र मंडळ, जामनेर – 24
सुयोग शिक्षण मंडळ – 23
महात्मा फुले शिक्षण विकास मंडळ – 18
नागरीक एज्युकेशन सोसायटी, पारोळा – 13
जनता शिक्षण मंडळ – 11
पंकज शैक्षणिक संस्था, चोपडा – 11
याव्यतिरिक्त इतरही काही शैक्षणिक संस्थांमध्ये अशाच प्रकारच्या नोंदी आढळल्या आहेत. या सर्वांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
🔴 आधीच कारवाई सुरू
नागपूर व इतर विभागांमध्ये गुन्हे दाखल व अटकसत्र सुरू आता त्याचे पडसाद जळगावात उमटण्याची शक्यता SIT आगमनानंतर दस्तऐवजांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी
🔴 राजकीय व सामाजिक दबाव
पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी मुद्दा उपस्थित सामाजिक संघटना व नागरिकांकडून पुराव्यानिशी तक्रारी त्यामुळे शासनाने SIT नेमण्याचा निर्णय घेतला
🔴 पुढे काय होणार?
संबंधित शिक्षक व संस्थांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता बोगस वेतन वसुलीची प्रक्रिया सुरू होऊ शकते
शिक्षण क्षेत्रातील मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता जळगावमधील बोगस शालार्थ आयडी घोटाळा हा राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांपैकी एक मानला जात असून, SIT चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाचे निर्देश : 20 टक्के अनुदानासाठी शालार्थ आयडीचेप्रस्ताव 5 दिवसांत सादर करा
पुणे : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20 टक्के अनुदान देण्याबाबत 25 जून 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी गतीने करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भात 20 मार्च 2026 रोजी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र जारी केले. या पत्रानुसार, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी आवश्यक शालार्थ आयडीचे प्रस्ताव 5 दिवसांच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावेत. तसेच उपसंचालकांनी या प्रस्तावांची तपासणी करून 10 दिवसांत पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनुदानासाठी पात्र असूनही वेतन न मिळाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. संबंधित सर्वांनी शासन निर्णयातील अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.












