भुसावळातील सेंट अलॉयसियस शाळेतील सक्तीच्या धार्मिक संस्कार प्रकरणात विलंबित FIR — स्थानिक प्रभाव, प्रशासकीय संथगती आणि बालसंरक्षणाच्या धोक्याचे गंभीर चित्र

धर्मनिरपेक्ष शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत — भविष्यातील कायदे बदलांची तातडीची गरज
भारतातील धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणालीच्या मूळ तत्त्वांना हादरा देणारी धक्कादायक घटना भुसावळात उघड झाली आहे. सेंट अॅलोयसियस हायस्कूल, भुसावळ येथील जवळपास ६० अल्पवयीन विद्यार्थ्यांना रॅलीच्या आड सक्तीच्या धार्मिक संस्कारांना सामोरे जावे लागल्याच्या आरोपावरून अखेर तीन महिन्यांनंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही FIR ०६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री २२:३९ वाजता FIR क्र. ०२६० या क्रमांकाने नोंदविण्यात आली.
परंतु — पुरावे, तक्रारी, निवेदने आणि तथ्याधारित चौकशी अहवाल असूनही FIR मध्ये झालेला विलंब — हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे की कोणत्या प्रभावशक्ती या प्रकरणावर झाक घालण्याचा प्रयत्न करत होत्या?
घटना नेमकी काय?
दिनांक ११ सप्टेंबर २०२५, सकाळी ०९.०० ते दुपारी १३.००
शाळेतील स्काऊट व गाईड युनिटचे विद्यार्थी:
• जामा मस्जिद – विद्यार्थिनींना स्कार्फ/हिजाब बांधण्यास सक्ती, जिहाद विषयक उपदेश,
“इस्लाम आतंक नव्हे आदर्श” हे धार्मिक साहित्याचे वाटप
• चर्च – विशिष्ट पद्धतीची प्रार्थना करण्यास भाग पाडणे
• गुरुद्वारा – धार्मिक परंपरा म्हणून लंगर ग्रहण करायला लावणे
• मंदिर – फक्त १५ मिनिटांची औपचारिक भेट
पालकांना संपूर्ण माहिती देण्यात आली नव्हती.
सहमतीपत्रात धार्मिक सक्तीबाबत कोणताही उल्लेख नव्हता.
अनेक पालकांना हे कळताच धार्मिक भावना दुखावल्याची भावना निर्माण होऊन शहरात तीव्र असंतोष पसरला.
चौकशी समितीचा निष्कर्ष: गंभीर उल्लंघने
त्रिस्तरीय समितीने १६ गंभीर त्रुटींचा अहवाल सादर केला:
✔ नियमानुसार कोणतीही शासकीय/स्काऊट परवानगी नाही
✔ SMDC ची अपूर्ण व संशयास्पद नोंद
✔ विद्यार्थ्यांची सुरक्षा, विमा, प्रवासाचे नियम पाळले नाहीत
✔ वेषभूषा बदल, धार्मिक उपासनेत सक्ती
✔ RTE Act व MEPS Rules चे उल्लंघन
✔ अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा भंग
✔ धर्मनिरपेक्षतेवर प्रतिकूल परिणाम
समितीने स्पष्ट शब्दांत नमूद केले:
“हा उपक्रम प्रथमदर्शनी सर्वधर्मसमभाव नसून धार्मिक आकर्षण व दबाव यांचा उद्देश दिसून येतो.”
FIR मध्ये उशीर का? ‘स्थानिक प्रभावशक्ती’ यांचा प्रश्न थेट समोर
तक्रारी, लिगल नोटीस, निवेदने, व्हिडिओ पुरावे — सर्व काही असतानाही
पोलीस तपास सुरू न होणे हे अत्यंत चिंताजनक.
• शिक्षण विभागाचा अहवालही पोलिसांकडे दिल्यानंतरही
• FIR करण्यास प्रशासकीय आढेवेढे,
• आदेश मिळाल्याशिवाय कोणतीही हालचाल नाही
अखेर — मुख्यमंत्री यांच्या निर्देशानंतर, आणि जिल्हा सरकारी अभियोक्त्याच्या कायदेशीर मतानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
हे सूचित करते:
“प्रशासन व पोलीस यंत्रणा जर राजकीय छत्रछायेत आली, तर न्यायाची गती थांबते.”
POCSO चा दृष्टीकोन — बालकांची मानसिक व धार्मिक शोषणाविषयी गंभीर विचार हे प्रकरण केवळ धार्मिक मतभेदांचे नाही. हे बालकांच्या मानसिक स्वायत्ततेवर आक्रमण आहे.
• अल्पवयीनांना समज न देता
• धार्मिक क्रिया, उपदेश, अनुष्ठानात सहभागी करणे
• जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीकडून सक्ती
➡ हे विश्वासघात, मानसिक छळ व ओळखीचे शोषण आहे.
➡ POCSO अंतर्गत मानसिक अत्याचाराचे घटक स्पष्ट दिसतात कायदे बदलाची तातडी — पुढील काळासाठी कठोर तरतुदी आवश्यक
राज्य व केंद्र शासनाने तातडीने खालील विचार करणे गरजेचे:
🔹 धार्मिक सक्तीविषयी विशिष्ट दंडनीय तरतूद
शाळांमध्ये धार्मिक प्रभाव टाकण्यावर शून्य सहनशीलता
🔹 POCSO कायद्यात स्वतंत्र उपविभाग
“Religious Exploitation of Minors” या नावे अपराध समाविष्ट करण्याची आवश्यकता
🔹 पालकसंमती नियम कडक
पूर्ण, स्पष्ट आणि लेखी माहितीशिवाय कोणताही बाह्य उपक्रम बंद
🔹 शाळा व्यवस्थापनाविरुद्ध संस्थात्मक गुन्हा
व्यवस्थापनही थेट जबाबदार
🔹 स्वतंत्र फास्ट-ट्रॅक पोलीस-न्याययंत्रणा
स्थानीय दबावापासून पूर्ण मुक्त
शेवटचा प्रश्न — आपल्या मुलांची ओळख बदलायची सत्ता कोणाला दिली?
शाळा म्हणजे ज्ञानाचे दालन धर्माचे रणांगण नव्हे.
तरीही –
• जर अशा घटना सद्भावनेच्या नावाखाली सुरू राहिल्या
• आणि
• प्रशासन राजकीय आदेशांची वाट पाहत बसले
तर संविधानिक मूल्यांचे काय होईल?
शालेय वर्गखोलीत एकच धर्म असतो — आणि तो म्हणजे भारतीय संविधान.
भुसावळातील घटना आंदोलनाची चेतावणी आहे.
आता निर्णय शासनाचा:
• मुले सुरक्षित ? की
• प्रणाली सुरक्षित?













