भुसावळ उपविभागातील आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची आढावा बैठक संपन्न, प्रांताधिकारी यांनी दिल्या सूचना

भुसावळ दि-30/05/25, भुसावळ विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनाची मान्सून पूर्व व मान्सून दरम्यान स्थितीच्या संदर्भात आढावा बैठक प्रांताधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीत उपविभागातील भुसावळ ,मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील सर्वच प्रमुख प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सदर बैठकीत आपत्ती व्यवस्थापन व नियोजन आराखड्याप्रमाणे कामकाज करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणेबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आलेली आहे.त्यात नगरपालिका, नगरपंचायत , तहसीलदार मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, हतनूर धरणाचे सहाय्यक अभियंता यांच्यासह कृषी, आरोग्य व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या आढावा बैठकीत नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी नियोजनात शहरातील गटारी नाले यांची साफसफाई करण्यात यावी. तसेच शहरात बांधकामाचे दगड-गोटे असे साहित्य अडथळा असल्यास ताबडतोब तो बाजूला करण्यात यावा. नाले तुंबू नये या दृष्टीने काळजी घेण्यात यावी.व स्वच्छता कामगारांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात याव्यात.तसेच शहरातील पडाऊ तथा जीर्ण इमारतींच्या संदर्भात त्यांना देण्यात आलेल्या नोटीसांचा अहवाल तसेच यासंदर्भात विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करणे शहरातील वीज विद्युत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठ्या संदर्भात दक्षता घेत शहरातील विजेच्या तारांवर अडथळा आणणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्या, वाकलेले वीजखांब काढण्यासाठी उपाययोजना करणे, जेणेकरून पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या, अशा सूचना प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आहेत.
याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या पावसाळ्यातील किड्सची देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देशही प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले त्याचबरोबर ग्रामीण भागातील खेड्यांमधील रस्ता दुरुस्ती त्याचबरोबर पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात याव्या, असे आदेशही गटविकास अधिकाऱ्यांना प्रांताधिकारी यांनी दिले. याचबरोबर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसंदर्भात सजग राहण्यासाठी व साथीचे रोग पसरणार नाही या संदर्भात काळजी घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला देण्यात आले त्याचबरोबर ग्रामीण भागामधील पाळीव जनावरे यांच्यावर साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्या खरिपाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानदारांकडूनच बियाणे खरेदी करावे बोगस बियाण्यांचे लिंकिंग करताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.या संदर्भात काही माहिती आढळल्यास लवकरात लवकर कृषी विभाग व प्रशासनाला सदरील माहिती कळविण्यात यावी.असे आवाहन प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.याबरोबर खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.याबरोबर विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील आपदा मित्रांना सूचना करून त्यांना माहिती द्यावी, तसेच ही सर्व यंत्रणा पावसाळ्यापूर्वीच कार्यान्वित करण्यात यावी.या बैठकीत भुसावळचे प्रभारी तहसीलदार जितेंद्र पाडवी, मुक्ताईनगरचे बोदवड नायब तहसीलदार बी डी पाटील, भुसावळ मुख्याधिकारी राजेंद्र फातले, मुक्ताईनगरचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे, तालुका कृषी अधिकारी प्रथमेश थोरात, भुसावळ तालुका कृषी अधिकारी डी आर जयंकार, बोदवड गटविकास अधिकारी आर बी सपकाळे, हतनुर धरणाचे सहाय्यक अभियंता भावेश चौधरी हे उपस्थित होते.













