महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री. मुकेश सारवान हे कामगारांच्या समस्यांसाठी उद्या भुसावळ व रावेर दौऱ्यावर
संतोष थामेत यांच्या आमरण उपोषणाची दखल

जळगाव दि.09/07/25 – महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे मा. उपाध्यक्ष श्री. मुकेश सोनु सारवान हे दिनांक ९ ते ११ जुलै २०२५ दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, पुनर्वसन व कायद्यांची अंमलबजावणी यासंदर्भात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. सारवान हे दिनांक ९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई येथून शासकीय वाहनाने रावेरकडे प्रयाण करतील. रात्री ११.३० वाजता रावेर येथील सर्किट हाऊस येथे त्यांचा मुक्काम.
१० जुलै रोजीचा कार्यक्रम:
गुरुवारी दुपारी ११.०० ते १२.०० या वेळेत रावेर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व उपाययोजनांबाबत आढावा बैठक. दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत भोजन (राखीव) असून, १.३० वाजता रावेरहून भुसावळकडे प्रयाण होईल.
सायं ४.०० ते ५.०० या वेळेत भुसावळ येथे संबंधित अधिकाऱ्यांसह पुन्हा आढावा बैठक होईल. रात्री पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, भुसावळ सर्किट हाऊस येथे मुक्काम.
११ जुलैचा कार्यक्रम:
शुक्रवारी सकाळी ७.०० वाजता भुसावळ येथून जळगावकडे प्रयाण.
दुपारी ११.०० ते १२.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे विविध शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होईल. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, आरोग्य व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी सहभागी होतील. हाताने मैला उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन, त्यांच्या समस्या व कायदा २०१३ अंतर्गत उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत भोजन (राखीव) असून, त्यानंतर दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत आयुक्त, जळगाव महानगरपालिका, तसेच धुळे येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या यावर बैठक होईल.
सायं ५.०० ते ६.०० या वेळेत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक.
जळगाव सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद व त्यानंतर मुक्काम













