सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सिब्बल यांची तिसऱ्यांदा निवड
विद्यमान अध्यक्षांचा दारूण पराभव
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विजय मिळवला आहे. सिब्बल यांना 1066 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांना 689 मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ वकील डॉ. आदिश सी अग्रवाला यांना २९६ मते मिळाली (आकडे तात्पुरते आहेत).
सिब्बल यांनी 2001-02 मध्ये एससीबीएचे अध्यक्ष म्हणून शेवटचे काम केले होते. याआधीही त्यांनी दोनदा 1995-1996, 1997-1998 यावर्षी अध्यक्षपद भूषविलेलं आहे.
निवड झाल्यानंतर त्यांनी वकील हे कायद्याचे राज्य राखण्यासाठी असतात. वकिलाचा उद्देश संविधानाचे रक्षण करणे हा असतो.त्यामुळे जर तुम्ही राजकीय झुकतेच्या आधारे बारचे विभाजन केले, तर खरे तर तुम्ही वकील म्हणून तुमचे कर्तव्य पार पाडत नाही. असे विधान नवनियुक्त अध्यक्ष कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे.