Advertisement
अर्थकारणकृषीक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

आ.एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येविरोधात गुन्हा दाखल; जमीन गैरप्रकाराने खरेदी केल्याच्या आरोपावरून फसवणूकसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद!

खडसे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ

जळगाव, ३० मार्च २०२६: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपुर येथील एका जमीन खरेदी प्रकरणाने मोठे राजकीय वर्तुळ ढवळून काढले आहे. आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय स्तरावरही चर्चेला उधाण आले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारीनुसार, सन २००२ मध्ये मानपुर शिवारातील महार वतनाची गट क्रमांक १२२ असलेली जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली खरेदी केल्याचे सांगण्यात आले. तक्रारदारांच्या मते, एकनाथ खडसे यांनी मूळ मालक चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना चांगला आर्थिक मोबदला देण्याचे तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, कालांतराने साखर कारखाना उभारण्यात आला नाही. उलट, ही जमीन शारदा एकनाथराव खडसे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. यामुळे तक्रारदारांना फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली.
तक्रार आणि गुन्हा नोंद
चमेलीबाई तुकाराम तायडे यांनी काही दिवसांपूर्वी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि अखेर बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्यात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात नेमके कोणते तथ्य समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp