35 लाखांच्या चोरीचा 72 तासात उलगडा,एलसीबी व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश

भुसावळ,दि-19/06/25, भुसावळ शहरात दिनांक 15 जून ते 16 जून दरम्यान फिर्यादी नंदलाल मिलकीराम मकडीया रा सिंधी कॉलनी भुसावळ यांचे गायत्री नगर मधील राजस्थान मार्बलच्या बाजुला असलेले पत्राच्या गोडावुनचे शटर उचकवुन अज्ञात चोरट्यांनी गोडावुनचे आत प्रवेश करुन फिर्यादी यांचे गोडावुन मधील इलेक्ट्रॉनीक वस्तु फ्रिज, वाशिंग मशीन, ए सी, इल ई डी टिव्ही असा एकुण 35,00,000/- रु किमतीचा मुद्देमाल हा चोरी करुन नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला सि सि टि एन एस गु.र.नं. 295 / 2025 भा. न्या. सं. कलम 305 (अ) 331 (3), 331 (4) प्रमाणे दिनांक 17/06/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान वरिष्ठांचे आदेशाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पथक हे समांतर तपास करीत असतांना गुन्ह्यात चोरी गेलेल्या मालाच्या ठाव ठिकाणाबाबत तांत्रिक विष्लेशणाद्वारे व गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीची खात्री केली असता सदरचा मुद्देमाल हा शिरपुर शहरातील करवंद रोड, महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्राचे गोडावुन मध्ये ठेवलेला असल्याचे व तो वरिल गुन्ह्यातील असल्याचे सदर पथक यांना तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सदरचा मुद्देमाल पोलीस पथकाने पंचांसमक्ष योग्य तो पंचनामा करुन एकुण 18,80,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा ज्या खाजगी गोडावुन मध्ये ठेवण्यात आलेला होता त्याचे मालक 1) मुजावर जामील शेख चांद वय 48 रा. न्यु बोराडी ता. शिरपुर ह मु गणेश कॉलनी आर सी पटेल उर्दु शाळे जवळ शिरपुर, 2) जफर शेख मुजावर वय 24 रा. मुजावर मोहल्ला शिरपुर ता. शिरपुर जि धुळे, अश्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री. कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ कार्यालय येथील पो हे कॉ उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ संदीप धनगर, पो शि सचिन चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि अमर अढाळे, पो शि प्रशांत सोनार, पो शि भूषण चौधरी, पो शि राहुल वानखेडे, पोशि जावेद शहा स्था गु शाखा पथक पो उप निरी श्री. शेखर डोमाळे, सहा फौज रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाळे, पो हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई अश्यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री. राहुल टि वाघ भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हे करीत आहेत.













