Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

4 लाखांचे चोरीचे तब्बल 33 मोबाईल जप्त , जळगाव MIDC पोलिसांची मोठी धडक कारवाई, दोघांना अटक

जळगाव दि-23/06/2025, जिल्हयामध्ये मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेडडी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सो. यांनी मोबाईल चोरीच्या घटना उघडकिस आणुन आरोपी अटक करणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे मा. उपविभागिय अधिकारी श्री संदिप गावीत सो. यांनी तसेच पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना केल्या होत्या. तसेच पो.स्टे. हददीत गस्त करीत असतांना संशयीतांची सखोर चौकशी करणे कामी कळविण्यात आले होते. दि. २१/०६/२०२५ रोजी शनिवार बाजार असल्याने मा. पोलीस निरीक्षक सो यांनी पोउपनिरी श्री राहुल तायडे, पोउपनिरी श्री चंद्रकांत धनके, पोना/प्रदिप चौधरी, पोकॉ/रतन गिते अशांना बाजार मध्ये पेट्रोलींग करणे बाबत सांगितल्याने सदर पथक हे बाजार मध्ये गस्त करीत असतांना पथकाला संशयीत रित्या फिरतांना एक आरोपी व दोन बालक दिसले त्यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे चार मोबाईल मिळुन आले मोबाईल बाबत विचारपुस करता काही एक माहिती सांगता न आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी करता, ते सर्व स्वामीनारायण मंदिर जवळ पाल टाकुन राहत राहत असलेल्या शेतात मध्ये जमीनीमध्ये एका पिशवी मध्ये पुरुन ठेवले आहेत असे सांगितल्याने आरोपी यास घेवुन सदर ठिकाणी जावुन पाहिले असता आरोपीने शेतातील एका झाडच्या जवळ जमीनीत खडडा करुन पुरुन ठेवलेले एका पिशवीतील एकुण ४,०९,००० किंमतीचे एकुण ३३ मोबाईल काढुन दिले, सदर मोबाईल हे शनिवार बाजार तसेच जिल्हयातील वेगवेगळया बाजार मध्ये चोरी केल्याचे आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया वय २३ रा. इंदोर राज्य मध्य प्रदेश याने सांगितले सदर आरोपी यास एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुरन / 449/2025 BNS कलम 303 (2) प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आले आहेत.
वरील जप्त 33 मोबाईल पैकी 1 मोबाईल रावेर पोस्टे हद्दीतुन गहाळ झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मोबाईल चे शोधात रावेर पोस्टे पोलीस अंमलदार महेश मोगरे हे त्या ठिकाणी आले असता सदर मोबाईल मध्ये रावेर पोस्टे हददीतुन गहाळ झालेले एकण 8 मोबाईल त्यांचे ताब्यात दिले आहेत.
तरी सदर आरोपी यास एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुरन / 449/2025 BNS कलम 303 (2) प्रमाणे गुन्हयात अटक करण्यात आली असुन पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास पोना / हेमंत जाधव हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक जळगांव श्री. महेश्वर रेडडी सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव श्री. अशोक नखाते सो जळगांव, मा. उपविभागिय अधिकारी श्री. संदिप गावीत सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड एम.आय.डी.सी.पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.ज्ञशहरातील तसेच जिल्हयातील ज्या नागरकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरी झाले असतील त्यांनी एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे किंवा imei no चेक करुन संपर्क करावा.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button