Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळ एमआयडीसी भागातील अवैध उत्खनन प्रकरणी तहसीलदारांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

भुसावळ,दि-03/02/2026: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) भुसावळ परिसरात अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा गंभीर प्रकार मिडियामेल न्युज च्या वृत्ताने ने उघडकीस आणल्यानंतर तहसीलदार निता लबडे यांनी त्याची लागलीच दखल घेऊन उपअभियंता, भुसावळ एमआयडीसी यांना आज यासंदर्भात खुलासा करणेबाबतची नोटीस बजावलेली आहे. तहसिलदार भुसावळ यांनी एमआयडीसीच्या उप अभियंत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करून ३ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसह अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांमध्ये मोठी खळबळ झालेली आहे.

अवैध उत्खननाचे तपशील
मंडळ अधिकारी (खडका भाग व पिंपळगाव भाग) आणि ग्राम महसूल अधिकारी (किन्ही, कन्हाळे बु. व खडका) यांनी दि. २३/१२/२०२५ रोजी केलेल्या पंचनामा व अहवालानुसार, एमआयडीसी भुसावळ परिक्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात खालील ठिकाणी अंदाजे २०० ते २५० ब्रास मुरूमचे अवैध उत्खनन आणि वाहतूक झाल्याचे नोंदवले आहे:
मौजे किन्ही : किन्ही गावाजवळ किन्ही-साकरी रस्त्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या खुल्या जागेत.
मौजे कन्हाळे बु. : महाबीज गोडावूनच्या (Godown) मागील खुल्या जागेत.
या मुरूमचा वापर एमआयडीसी परिसरातील सुरू असलेल्या बांधकामांसाठी अवैधरित्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची नोंद तहसिल कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून,प्रकरण पंजीबद्ध झाले आहे.
पूर्व नोटीस आणि प्रतिसादाचा अभाव
या प्रकरणी तहसिल कार्यालयाने आधीच दि. ०१/०१/२०२६ रोजी नोटीस क्र. जमीन/२/गौणख/कावि/३५५/२०२५ (Comp No. २९२९३९३) जारी केली होती. त्यात आवश्यक कागदपत्रांसह खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, अद्यापपर्यंत एमआयडीसीकडून कोणताही लेखी खुलासा किंवा स्पष्टीकरण प्राप्त झालेले नाही.
मुख्य प्रश्न आणि मागणी
तहसिलदार निता लबडे यांनी नोटीसमध्ये खालील मुद्दे उपस्थित केले आहेत:
1)सदर मुरूम उत्खनन व वाहतुकीबाबत शासकीय रॉयल्टी भरणा केली आहे की नाही?
2)परवाने, पास, पावती, चलने इत्यादी सर्व संबंधित कागदपत्रांसह समक्ष खुलासा सादर करावा.
3)नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत हे करणे बंधनकारक आहे.
संभाव्य कारवाई अशी…
खुलासा सादर न केल्यास किंवा पुरावे अपुरे ठरल्यास खालील कायद्यांनुसार कारवाई होईल:
1)महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) आणि ४८(८).
2)जिल्हाधिकारी जळगाव यांचे परिपत्रक क्र. गौणख/ई-कावि/२०२३/८/२६ दि. २८/०१/२०२५ नुसार दंडात्मक कारवाई.
या घटनेमुळे एमआयडीसी भुसावळ परिसरातील गौणखनिज (मुरूम) तस्करी आणि अवैध उत्खननाच्या प्रकरणांना नवीन वळण मिळाले आहे. भुसावळ तालुक्यात अशा घटना यापूर्वीही नोंदवल्या गेल्या असून, महसूल विभाग आता औद्योगिक वसाहतीतील माफियांवर आणि अवैध गौण खनिज वाहतूकीवर कारवाई करणार असल्याचे दिसते. एमआयडीसीकडून आता याबाबत  काय स्पष्टीकरण येते,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button