खलिस्थान समर्थक अमृतपालसिंह जेलमधून निवडणूक जिंकल्याने पंजाबसह देशभरात मोठी खळबळ
खलिस्तानी अतिरेकी आता संसदेत जाणार ?
नवी दिल्ली, दिनांक 4 जून, देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आलेले आहेत. असाच एक धक्कादायक निकाल पंजाबमध्ये लागलेला असून देश विरोधी कृत्य आणि खलिस्तान चळवळीला पाठिंबा देऊन पंजाबमध्ये तरूणांना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आक्षेपार्ह प्रवचन दिल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कायद्यान्वये आरोप झाल्याने आसामच्या दिब्रुगड जेलमध्ये कैदेत असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग हा त्याच्या पंजाब मधील खदूरसाहिब या लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून तब्बल एक लाख 78 हजार मतांनी निवडून आल्याने पंजाबसह देशभरात मोठी खळबळ उडालेली आहे.
अमृतपाल सिंह याला तब्बल 3 लाख 76, 287 मते पडलेली असून त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंग जीरा यांना 198265 एवढी मते मिळालेली आहे. मात्र तो देश विघातक कारवायांप्रकरणी कैदेत असल्याने आता संसदेमध्ये कसा उपस्थित राहील याकडे देशातील सुरक्षा यंत्रणांसह जनतेचे लक्ष लागून आहे.