भुसावळात भाजपातर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराणा प्रताप यांच्या पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे होते. त्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व समाजबांधवांनी महाराणा प्रताप यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, मनोज बियाणी, नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, पिंटू ठाकूर, सुजित भोळे, मुकेश पाटील, रुपेश देशमुख, प्रा. प्रशांत नरवाडे, ललित मराठे, संग्रामसिंग पाटील, समिती अध्यक्ष विक्रांतसिंग राजपूत, समिती सचिव आकाश राजपूत, उपाध्यक्ष नकुल राजपूत, सहसचिव गोपीसिंग राजपूत, जयप्रकाश शुक्ला, भाजपा शहर सरचिटणीस जयंत माहुरकर, सागर चौधरी, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकल्प वाणी, शैलेजा पाटील, अलका शेळके, रणधीर इंगळे, शंकर शेळके, रेहमान शेख, ऋषभसिंग राजपूत, मनिष पाटील, नरेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्षत्रिय राजपूत नवयुवक मंडळाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले असून, उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा निर्धार व्यक्त केला.









