भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील 2 सहा. फौजदारांना लाच घेताना रंगेहाथ अटक

भुसावळ दि- 22/08/25, अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी पाच हजारांची मागणी करून त्यापैकी २ हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते. हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता.
‘लाचलुचपत’ चा सापळा यशस्वी
1) बाळकृष्ण मुकुंदा पाटील, वय- 55 वर्ष, व्यवसाय -नोकरी, सहा फौजदार खाते पोलीस विभाग (वर्ग 3)
2) आत्माराम सुधाम भालेराव, वय 57 व्यवसाय- नोकरी, सहा फौजदार दोन्ही नेमणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन खाते पोलीस विभाग (वर्ग 3)
3) ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे वय 42 वर्षे व्यवसाय मजुरी रा. शिपूर कन्हाळा ता. भुसावळ (खाजगी इसम) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारदार यांचे विरुद्ध खामगांव कोर्ट जि बुलढाणा येथे कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्स ची केस दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते . सदर वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात यातील आलोसे 1 व 2 यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि . 21/08/2025 रोजी ला प्र विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे 1 व 2 यांनी पंचासमक्ष 2000/- रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झालेले आहे . त्याप्रमाणे आज रोजी सापळा कारवाईचे आयोजन केले असता आलोसे क्रमांक 1 यांचे सांगणेवरून आरोपी क्रमांक 3 यांनी लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून यातील तीन ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने भुसावळ तालुक्यातील नागरिकांमध्ये पोलीस दला विषयी संताप व्यक्त होत आहे.













