Advertisement
क्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबई

गोविंदाच्या पायाला लागली गोळी, नेमकं कुठे व काय घडलं , मुंबई पोलिसांचा तपास सुरू


मुंबई दि-01/10/24, बॉलीवूडचा हीरो नंबर वन अशी ओळख असलेला अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याने त्याला पायाला दुखापत झाली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.


गोविंदा आज सकाळी मुंबईतील जुहू बंगल्यावर एकटाच असताना ही घटना घडली. पहाटे ४:४५ वाजता घरातून घाईगडबडीत निघताना हा प्रकार घडला. त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक महिती आहे. याप्रकरणी कोणाचीही तक्रार नसून सध्या गोविंदा यांच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळील बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.
परवानाधारक बंदुकीचा ट्रीगर अनावधानाने दाबला गेला, त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटली. ती गोविंदाच्या पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो सुखरूप असल्याचे समजते. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp