Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगाव

भुसावळात घरफोडी उघड; ५.७० लाखांचा मुद्देमाल लंपास करणारा आरोपी 48 तासांत जेरबंद,

चोरीचे 70 हजार रू उडवल्याचा संशय

भुसावळ  : बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या दोन दिवसांत मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ५ लाखांच्या मुद्देमालाची पुनर्प्राप्ती करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी गु.र.नं. १५९/२०२६, बी.एन.एस. २०२३ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी २८ मार्च ते ३० मार्च दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५,७०,००० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. डी.बी. पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हलवली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अमीर खान हबीब खान (वय ३५, रा. न्यू ईदगाह जवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने एका विधीसंघर्ष बालकाशी मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील ४,९९,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.
या कारवाईत डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या तत्परतेमुळे गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp