Advertisement
क्राईम/कोर्टजळगाव

भुसावळ: राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; पती-पत्नी जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बु. गावाच्या गेटसमोर दीपनगरकडे वळणाऱ्या रस्त्यावर भरधाव बोलेरोने दुचाकीला मागून धडक दिल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रणजित सुरेश कुशवाह (वय 45, व्यवसाय हातमजुरी, रा. जयसिंगपुरा, ता. बुरहानपूर, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक MH-19-EG-4003 च्या अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134(ब), 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजेच्या सुमारास रणजित कुशवाह हे त्यांच्या पत्नी सरलाबाई रणजित कुशवाह यांच्यासह हिरो कंपनीची HF डिलक्स (क्र. MP-68-MA-9294) या दुचाकीवरून दीपनगर हायवे क्रमांक 53 मार्गे वरणगावकडे जात होते. त्यावेळी निंभोरा बु. गावाच्या प्रवेशद्वारासमोर दीपनगर बाजूकडे वळणाऱ्या रस्त्यावर मागून भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा बोलेरो (क्र. MH-19-EG-4003, पांढऱ्या रंगाची) या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत रणजित कुशवाह व त्यांच्या पत्नी सरलाबाई हे दोघेही जखमी झाले. अपघातानंतर संबंधित बोलेरो चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोहेका/1280 संदीप बडगे करीत आहेत. आरोपी चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp