Advertisement
जळगावनोकरीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्याधिकारी यांच्यासोबत श्री संतोष थामेत यांची सकारात्मक बैठक संपन्न

सफाई कामगारांचा योद्धा श्री संतोष थामेत

जळगाव -31/07/25, अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री संतोष थामेत यांनी आज 31 जुलै 2025 रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री सुभाष जानोरे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य व हक्कांबाबतच्या मागण्यांसाठी सकारात्मक चर्चा केली आहे. यात खालीलप्रमाणे तीन प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यासाठी राज्य शासनाकडे सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करून नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी श्री सुभाष जानोरे यांनी दिलेले आहे.

1. सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन: महाराष्ट्रातील 129 नवनिर्मित नगरपंचायती आणि 9 नगरपरिषदांमध्ये कार्यरत, सेवानिवृत्त, तसेच मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.
2.किमान वेतन: सफाई कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार आणि किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार त्याप्रमाणे पगार व इतर आरोग्य आणि यथोचित कौटुंबिक लाभ देण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून त्यांच्या दीर्घकालीन सेवेचा योग्य मोबदला त्यांना मिळू शकेल.
3. रोजगार आणि प्राधान्य: सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, यामध्ये विशेषत: वाल्मीक मेहतर समाजातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी 31 ऑक्टोबर 2023 च्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करणेबाबत मागणी करण्यात आली आहे.

आज झालेल्या या सकारात्मक चर्चेत सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार तातडीने कारवाईची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष साजन पथरोड यांचेसह मुकेश तेजी ,राजू हंसकर जितेंद्र बग्गन, शिवकुमार तेजी, दीपक चनाल, श्रावण तेजी, गोविंदा तेजी ,वसंत तेजी, किशोर तेजी, अमर झांजोट , दयाप्रसाद कटारिया,मनोज डेनवाल ,राजू सपकाळे, दीपक पारोचे, किसन लोहिरे, सागर चिरांडे, कालिचरण तेजी आदी सफाई कामगार बांधव उपस्थित होते.
सफाई कामगारांसाठी यशस्वी लढा
अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री संतोष  थामेत यांनी काही दिवसांपूर्वी भुसावळ येथे सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या मागण्यांसाठी पाच दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्याची दखल अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आणि  सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी देखील घेतलेली असून त्यांच्या लढ्याचे कौतुक केलेले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाने सफाई कामगारांच्या हितासाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आणि अधिसूचनेनुसार केलेल्या मागण्या या तात्काळ मार्गी लावण्यासाठी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून मंत्रालयात आयोगाचे उपाध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोगाच्या निर्देशानुसार बैठकीला उपस्थित राहून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले असून त्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp