रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरट्यास केली अटक

जळगाव – जिल्ह्यातील रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरट्यास केली अटक केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पारश्याच्या नाक्याजवळ गजानन विखे यांनी गाडी उभी करून शौचास गेले असता त्यांच्या मालकीची ज्युपिटर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.त्यावरून गजानन मधुकर विखे राहणार डाकवाडी राजापुर बऱ्हाणपूर यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या शोधासाठी संपुर्ण परिसरातील सी सी टी व्हि चे फुटेजची तपासणी करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून आरोपी नामे उबेद बेग शब्बीर बेग लोहार वय 26 वर्षे राहणार मिल्लत नगर फैजपुर येथुन ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. व गुन्ह्यातील मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले आरोपींकडून अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत पुढील तपास सुरू आहे त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक मा.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधिकारी मा.अशोक नखाते,फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल,गुन्हे शोध पथकाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर, पोलिस नाईक कल्पेश आमोदकर,विशाल पाटील,प्रमोद पाटील,श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, भुषण सपकाळे यांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हमीद तडवी करीत आहे.













