क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

बालवाडीच्या बालकांच्या शालेय पोषण आहारातील खिचडीत आढळल्या अळ्या ! जिल्हाधिकारी म्हणाले की….

जळगाव दि-20/09/2024 जळगाव शहरात हरिविठ्ठल नगरात बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी क्रमांक ६१ मध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत आळ्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडालेली आहे.याबाबत पालकांकडून प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. शिवाय, पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला आहे. 

खिचडीत आढळल्या आळ्या

बालविकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत हरिविठ्ठल नगरात अंगणवाडी (क्र.६१) चालवली जाते. या अंगणवाडीत 50 बालके व बालिका येतात. बालकांसाठी श्री सद्गुरू महिला बचत गटाकडून आहार पुरवण्यात येतो. सकाळी अंगणवाडीतील बालकांना डब्यात पोषण आहारातील खिचडी देण्यात आली. कनिष्का बोरसे या मुलीच्या खिचडीत आळ्या आढळून आल्या आहेत. अधिकारी वेळेवर धान्याची तपासणी करत नसल्यामुळे पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का ? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय. 

काय म्हणाले जिल्हाधिकारी?

अंगणवाडीमध्ये तयार होणाऱ्या आहारासंदर्भात काळजी घेण्याचे सूचना या आयुक्तांकडून प्राप्त होत असतात. त्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती देखील तयार करण्यात आली आहे. जर अशा पद्धतीने आहारात काही सापडलं तर त्याची पूर्ण बॅच नष्ट करत असतो. तसेच याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देखील अंगणवाडी सेविकांना वारंवार दिलेल्या असतात. त्यामुळे आजपर्यंत बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या आहारापासून झालेला नाही. यासंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार आयुक्त कार्यालयाला आहे आणि या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button