Advertisement
जळगावमहाराष्ट्रमुंबई

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रांतकार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बीएलओंची बैठक संपन्न

भुसावळ, दि-12 /06/2025, नुकतेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असून त्या दृष्टीने आता जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन देखील कामाला लागलेले आहे. त्या अनुषंगाने आज भुसावळ येथील उपविभागीय कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासह निवडणूकीशी संबंधित कामकाजावर आढावा बैठक घेण्यात आली. भुसावळ तालुक्यात एकूण 314 बीएलओ असून त्यापैकी बहुतांश जण आजच्या बैठकीला उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन पुढीलप्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहेत.

  1. जुलै १, २०२५ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र तरुणांची नोंदणी करणे
  2. मृत मतदारांचे नाव वगळणे
  3. लग्नानंतर गावातून इतरत्र स्थलांतरित झालेल्या मुलीचे नाव वगळणे
  4. लग्नानंतर गावात आलेल्या विवाहित महिला यांचे नाव नोंदणी करणे
  5. दुहेरी नोंदणी (Double Entry) असलेल्या मतदारांचे तपासणी करुन एक नाव वगळणे
  6. ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी स्थलांतरित झालेले मतदारांचे नाव वगळणे
  7. सर्व बिएलओ यांनी BLO App डाऊनलोड करुन त्यावर नमुना 6, 7 व 8 फॉर्म ची एन्ट्री करणे
  8. एका यादी भागात 1200 च्या वर मतदार संख्या असता कामा नये असल्यास त्या यादी भागाचे दोन भाग करण्यात
    येऊन सदर यादी भागासाठी स्वतंत्र बिएलओ नेमणुक करण्यात येईल.
  9. सर्व बिएलओ यांनी आपल्या मतदान केंद्राची पाहणी करुन सुस्थितीत असल्याची खात्री करुन मतदान केंद्रे बदल /
    दुरुस्ती आवश्यक असल्यास तात्काळ या कार्यालयास अहवाल सादर करावे.
    सदरील बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे , भुसावळचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, अव्वल कारकून निवडणूक के आर तडवी यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button