Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमुंबई

भुसावळमध्ये सट्ट्याच्या टपरीवर रोकड लुटण्यासाठी उल्हास पाटील वर गोळीबार; अवैध धंदेवाल्यांमध्ये असुरक्षितेची भावना

भुसावळ दि-17/12/25 : भुसावळ शहरातील जुना सातारा भागात सट्ट्याच्या टपरीवर अज्ञात व्यक्तीने 39 वर्षीय उल्हास गणेश पाटील याच्यावर गोळीबार केला. उजव्या खांद्याजवळ गोळी लागल्याने ते जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. शहरात पहिल्यांदाच अवैध धंद्याशी संबंधित व्यक्तीवर अशा प्रकारे गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये सुद्धा आता असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
घटना भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीवर गोंधळ घालत रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास पाटील यांनी विरोध केल्याने एका संशयिताने कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी उजव्या खांद्याजवळ लागल्याने पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळीबारानंतर चौघेही संशयित घटनास्थळावरून पसार झाले. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाटील यांना प्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button