Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमुंबईराजकीयराष्ट्रीय

भुसावळ : नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध केल्याच्या निषेधार्थ भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे ‘जन आक्रोश’ आंदोलन

भुसावळ, २६ एप्रिल २०२६ : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) ला काँग्रेस व विरोधी पक्षांच्या आघाडीने विरोध केल्याच्या निषेधार्थ भुसावळ येथे भाजप महिला पदाधिकारी आणि समर्थकांनी जन आक्रोश आंदोलन केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन शांततेत पार पडले आहे.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई सावकारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस व विरोधी आघाडीच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, संसदेत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी अडथळा निर्माण केला. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे हे संविधान दुरुस्ती विधेयक पास होऊ नये, यासाठी विरोधकांनी प्रयत्न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. भाजपने या भूमिकेला “महिलाविरोधी” असल्याचे म्हटले आहे.
देशभर आणि राज्यभर भाजपकडून नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ आंदोलनांची मालिका सुरू असून, भुसावळातील हे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी हा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
नारीशक्ती वंदन अधिनियम हा २०२३ पासून राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला महत्त्वाचा विधेयक आहे. या कायद्यानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) नंतर होणार असल्याने विरोधकांनी त्याला “फसवे” किंवा “अपूर्ण” ठरवत आक्षेप नोंदवले आहेत. तर भाजपने हा मुद्दा महिलांच्या सक्षमीकरणाशी जोडत जनआंदोलनाचे रूप दिले आहे.
या आंदोलनावेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेविका प्राची पाटील, सोनल महाजन, सोनल इंगळे, सीमा नरवाडे, पूजा तायडे, प्रिती पाटील, आशा पाटील, ममता नांगराची, अनिता सपकाळे, मेघा वाणी, प्रिया चौधरी, संगीता बियाणी, अनिता आंबेकर यांच्यासह भाजपच्या आणि प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp