जळगावातील हॉटेल रॉयल पॅलेसमधील जुगारावर LCB चा छापा, 8 जुगारींसह तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यातील इतरही अवैध धंद्यांवर लवकरच होणार कारवाई

जळगांव दि-10/07/25, जळगाव शहरातील नामांकित अशा थ्री स्टार रॉयल पॅलेस हॉटेलवर स्थानिक गणेश शाखेची धाड पडून आठ जुगारींसह कंपनी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यातील अवैध धंदे चालणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. जिल्हयात जुगाराचे प्रमाण वाढत असल्याबाबत महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक ,जळगांव परिमंडळ यांच्या सुचने नुसार संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, जळगांव यांच्या लेखी आदेशान्वये संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पो.उप निरी. शरद बागल, सहा. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ.प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील, पो. कॉ. रविंद्र श्रावण कापडणे अशांचे पथक तयार करुन दि.१०/०७/२०२५ रोजी गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमी प्रमाणे, हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदाना जवळ जळगांव येथील रुम नं. २०९ मध्ये काही इसम स्वता:चे फायदयासाठी तिन पत्ती जुगारावर पैसे लावून हार जित तिन पत्ता ( झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यावरुन दि. ११/०७/२०२५ रोजी रात्री ००.०१ ते ०१.०० वाजे दरम्यान हॉटेल रॉयल पॅलेस येथे जावून स्था. गु. शा. पथकाने खात्री केली असता, नमुद हॉटेल मधील रुम नं. २०९ हा मदन लुल्ला याचे नावावर आरक्षीत केला होता. सदर ठिकाणी जावून छापा कारवाई केली असता छापा कारवाई दरम्यान एकूण ०८ इसमांकडून एकुण १९,९७,०००/- रु. किमतीचे रोख रक्कम व वेगवेगळया कपंनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट जु.वा.कि.अ. असा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल व ०८ इसम ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द सहाफौ. अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यास सी.सी.टि.एन.एस.क्र.२५३/२०२५, महा. जुगार कायदा कलम १२ (अ), ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नमुद गुन्हयाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.
जिल्ह्यातील इतरही ठिकाणी लवकरच कारवाई जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्रासपणे सट्टा मटका जुगार सुरू असून आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सर्व अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत असतात. त्या अवैध धंद्यांवरही आता ठोस कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागलेली आहे.













