Advertisement
जळगावनिवडणूकराजकीय

भाजपच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांना माघारी का घ्यायला लावली ?- उमेश नेमाडेंचा सवाल

भुसावळ- शहरात काल माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केलेले आहे.

अनिल चौधरी नेमकं काय म्हणाले ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ शहरासह जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेमध्ये भाजपचे भुसावळ शहर अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांना भाजपने व्यासपीठावर जागा दिली नसल्याचा दावा केला होता.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या विरोधात देखील भाजपची बी टीम असून त्यांच्याच खर्चाने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रचार कार्य सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाला खोडून काढण्यासाठी आज उमेश नेमाडे यांनी अनिल चौधरी यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे.

उमेश नेमाडे काय म्हणाले ?

भारतीय जनता पक्षाच्या दोन उमेदवारांना त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत फॉर्मधारक उमेदवारांना माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांचे बंधू अनिल चौधरी यांच्या संमतीनुसार माघार घेऊन भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध विजयी करण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे संतोष चौधरी आणि बंधू अनिल चौधरी यांची भूमिका स्पष्ट दिसून येत आहे की, भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माघारी घ्यायला लावल्याचे स्पष्ट झालेले आहे. आणि ते उलट आमच्यावर आरोप करतात. तस पाहिले तर आधी त्यांनी याचं उत्तर द्याव की, भाजपच्या उमेदवारांचा विजयी होण्याचा मार्ग मोकळा का केला ? याच्या मागचे अर्थकारण काय आहे ? असा सवाल उमेश नेमाडे यांनी अनिल चौधरी यांना आता विचारलेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp