स्वप्नांची केळी-गांजा बाग भस्म झाली,लाखो रुपयांची गांजाची शेती उद्ध्वस्त केली,जळगाव LCB ची मोठी कारवाई

जळगाव, दि. १९ नोव्हेंबर २०२५ ,स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे अवैध गांजा लागवडीचा मोठा साठा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल ३ क्विंटलहून अधिक गांजाची हिरवी झाडे जप्त करण्यात आली असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे २३ लाख २२ हजार २०० रुपये आहे.
पोलिसांना खात्रीलावून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी मनोज नामदेव घटे (वय ४०, रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर) याच्या मालाच असलेल्या शेतात ही मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. पोलिसांनी शेतात छापा टाकत ५१ हिरवी गांजाची झाडे जप्त केली, जिनांचे एकूण वजन ३४१ किलो ५०० ग्रॅम (३ क्विंटल ४१ किलो ५०० ग्रॅम) आहे.
आरोपी मनोज घटे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित (भुसावळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे (मुक्ताईनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी तसेच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख, छगन तायडे, रतन गिते, मयूर निकम, रविंद्र चौधरी आणि चालक भरत पाटील यांनी सहभाग घेतला.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस हवालदार चंद्रकांत बोदडे, मोतीलाल बोरसे, चेतन महाजन, रविंद्र धनगर, दीपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भिल आणि जितेंद्र महाजन यांच्या पथकानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अलीकडेच जिल्ह्यात वाढत असलेल्या गांजा तस्करी आणि अवैध लागवडीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.













