Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भुसावळात घरफोडीची फिर्याद आईच्या सांगण्यावरून ! पोलिसांची दिशाभूल करून घरफोडीचा बनाव LCB ने आणला उघडकीस

सोने बँकेत तारण ठेवून घरफोडीचा गुन्हा बनाव केला

भुसावळ,दि-12/06/2025, भुसावळ शहरात दिनांक १० जून रोजी दुपारी १२.०० वा. ते १३.३० वाजे दरम्यान लिम्पस क्लब जवळ, आर.बी. २/९५८ A नॉर्थ कॉलणी एरीया, भुसावळ या ठिकाणी घरफोडी झाल्याने भुसावळ शहर पो.स्टे. CCTNS.NO. १४३ / २०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (a) प्रमाणे दि. १०/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. ११/०६/२०२५ रोजी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले असता घटनास्थळाचे बाजुस असलेले घर हे १० दिवसापासून बंद होते परंतु सदर घरात चोरी झाल्याचे दिसून आले नाही. सदर गुन्हयातील फिर्यादीचे घराचे कुलूप हे तुटलेले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी फिर्यादीचे घरातील लोकांना सदर घरफोडी चोरी बाबत सखोल विचारपुस केली असता, फिर्यादीची आई नामे शर्मीला चंद्रमनी शिंदे, यांना काही दिवसापूर्वी जुगार खेळण्याची सवय जडल्याने त्यांनी घरातील रोख रुपये व सावकाराकडून घेतलेले पैसे हे जुगारात हरल्याने ते पुन्हा जुगार खेळून जिंकण्याच्या अमिषाने तीने घरात कोणास काहीएक न सांगता त्यांनी त्यांचे घरातील त्यांचे व त्यांच्या आईचे सोन्या- चांदीचे दागिने हे त्यांनी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक शाखा, भुसावळ येथे तारण ठेवून त्यावर गोल्ड लोन घेवून सदर पैसे जुगारात, आईच्या आजारपणात तसेच घर खर्चात झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. काही रोख रक्कम सुध्दा त्यांनी जुगारात खेळण्यासाठी वापल्याचे सांगितले आहे. शर्मीला चंद्रमनी शिंदे यांनी सदर घरफोडी चोरी झाल्याचा बनाव करुन फिर्यादी चेतन चंद्रमनी शिंदे यांना सांगितल्याने त्यांनी सदर बाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
शर्मीला चंद्रमनी शिंदे यांनी बॅकेत तारण ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या पावत्या बँकेकडून प्राप्त केलेल्या आहेत. अशा प्रकारे खालील नमुद स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांचे तपास स्त्रोत वापरुन चौकस बुध्दी वापरुन सदर गुन्हयातील आरोपी शर्मीला चंद्रमनी शिंदे, वय ४९, रा. आर. बी. २/९५२, नॉर्थ कॉलणी एरीया लिम्पस क्लब भुसावळ हिस निष्पन्न करण्यात आले आहे. सदरची कारवाई मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. संदिप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्या मार्गदर्शनुसार पो.उप निरी. श्री. शरद बागल, सहाफौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ.संदिप चव्हाण व चा. पो. कॉ. महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी केला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button