Advertisement
राजकीय

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

चाळीसगाव, दि. १५ जून २०२५ :
चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

  1. लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा. कोंगानगर)
  2. दशरथ उदल पवार (वय 24 वर्षे, रा. कोंगानगर)
  3. समाधान प्रकाश राठोड (वय 9 वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)

या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button