गंगाराम प्लॉट भागात शिट्टी जोरदार वाजली ! प्रचार कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन, राज विजय चौधरी यांचा विजयाचा विश्वास
शिट्टीच्या आवाजाने गुंजला परिसर

भुसावळ दि-27/11/25, , नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक 20 ब मधील अपक्ष उमेदवार राज विजय चौधरी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज वार्डातील सुजाण मतदार राजाने फित कापून केलेले आहे. यावेळी सर्व समर्थक मतदारांनी जोरदार शिट्ट्या वाजवत एकच जल्लोष केला. मतदारांनी वाजविलेल्या या शिट्ट्यांच्या जोरदार आवाजाने परिसर दणाणून सोडलेला होता.

उमेदवार राज विजय चौधरी जाहिरनामा असा आहे…
१) पंचशील नगरातील बुद्ध विहारमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य दिव्य नूतनीकरण करणार
२) वैकुंठवासी ह.भ.प. एकनाथ महाराज खडसे यांच्या आठवणीसाठी आम्ही संतोषी माता मंदिरासमोर मोक्याच्या जागेत भव्य दिव्य स्मारक बनवणार
३) वार्डामध्ये चोरी व अप्रिय घटना टाळण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
४) प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याची सुविधा व नवीन पाणीपुरवठा योजना, संपूर्ण प्रभागात आयपीएस गटारी बांधून व स्वच्छता राखण्याला प्राधान्य देणार
५) 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या अतिक्रमण धारकांना शासनाच्या नियमानुसार घरे अधिकृत करण्यासाठी घर त्यांच्या नावाने करण्यासाठी प्रयत्न करू, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊ असे म्हटलेलं आहे.
यासह अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान , या प्रभागात यापूर्वी दोन पंचवार्षिक निवडणुकीत केलेल्या विकासकामांमुळे आणि मतदारांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक विजय मोतीराम चौधरी यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 20 ब मधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर उमेदवार राज विजय चौधरी यांनी वार्डातून डोअर टू डोअर मतदारांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतलेले आहे. उमेदवार राज चौधरी यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.













