Advertisement
जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावर, विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

जळगाव दि-१७/०६/२५, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 20 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून ते आधी जळगाव , धरणगाव आणि नंतर अमळनेर या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा प्रशासनाला त्यांच्या दौऱ्याचे आदेश प्राप्त झालेले असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची तयारी केलेली आहे.
या दौरा दरम्यान त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगावचे आमदार राजूमामा भोळे आणि जळगाव जिल्ह्यातील महायुतीचे सर्व अकरा आमदार ,खासदार , पदाधिकारी आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित इतर सहकारी संस्थांचे अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button