आमोद्याजवळील मोर नदीचे कठडे तोडून ३० प्रवांशांची खाजगी बस पुलावरून खाली कोसळली,अपघातांची मालिका सुरूच
मोर नदीवरील अपघातांची मालिका सुरूच

भुसावळ दि-०६/०७/२५, यावल तालुक्यातील फैजपूर -आमोदा गावाजवळ मोर नदी पात्रात इंदोर येथून येणारी भुसावळकडे जाणारी गणेश ट्रॅव्हल्स मामाची नावाची खाजगी लक्झरी बस नदीपात्रात पलटी झाली त्यात 25 ते 30 प्रवासी जबर जखमी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, आज रविवारी सकाळी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी पुन्हा एकदा मोर नदीच्या जवळ मोठी दुर्घटना घडली आहे. या बसचा क्र. एम पी 30 -9009 असा आहे. जखमींना फैजपूर येथील खाचणे हॉस्पिटलमध्ये तर इतर गंभीर जखमींना पुढील औषधोपचारासाठी भुसावळ येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

बस मोर नदीच्या पुलावरून सुमारे १५ फूट खोल खाली उलटलेली असून, अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा ब्रेक फेल होणे, हे संभाव्य कारण मानले जात आहे. घटनास्थळी पोलीस, आपत्कालीन सेवा आणि क्रेनच्या सहाय्याने बस हटवण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, आमोदा मोर नदीवर परिसरात हा या दोन महिन्यातील २८ वा अपघात असून, या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.













