
भुसावळ दि-21/12/25, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी झाल्या असून त्यांना 42 हजार 234 मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांना 40 हजार 387 मते मिळाली. 1847 मतांनी गायत्री भंगाळे-गौर विजयी झाल्या आहेत. विजयानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत आघाडी बदलत राहिल्याने निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अटितटीचा राहिला.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने प्रभाग क्रमांक 3, 4, 6, 12, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 या प्रभागांत मोठे मताधिक्य घेत विजयाची पायाभरणी केली. विशेषतः प्रभाग 12, 15, 16 आणि 17 मध्ये मिळालेल्या हजारोंच्या मताधिक्याने निकालाची दिशा निर्णायक ठरली .दुसरीकडे भाजपच्या रजनी सावकारे यांनी प्रभाग क्रमांक 1, 2, 5, 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 21, 22, 23, 24 आणि 25 मध्ये आघाडी घेत जोरदार टक्कर दिली. प्रभाग 8, 10, 22 आणि 23 मध्ये भाजपला मोठ्या फरकाने मते मिळाली असली, तरी शहरातील इतर प्रभागांतील कमी फरकामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग क्रमांक 23 मध्ये चमत्कार
1) प्रभाग क्रमांक 23 मध्ये बहुतांश सिंधी समाजाची मते असून या ठिकाणी सिंधीबहुल प्रभागात राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचा एकही नगरसेवक पदाचा उमेदवार नसताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांना तब्बल 669 मते मिळालेली आहेत. ही भाजपसाठी सर्वात धक्कादायक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपच्या महिमा अजय नागराणी या बिनविरोध निवडून आल्या होत्या. आणि आता प्रकाश बत्रा हे देखील निवडून आलेले आहे.
2) प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपचे उमेदवार महेंद्रसिंग ठाकूर यांना एकूण 4191 मते पडलेली असून ते विजयी झालेले असले तरी त्या प्रभागात भाजपच्या उमेदवार रजनी सावकारे यांना 3477 मते मिळालेली असून भाजपच्या महेंद्रसिगं ठाकूर यांच्यापेक्षा येथे तब्बल 714 मते त्यांना कमी पडलेली आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असताना इथेही मोठा धक्का बसलेला आहे.
3) प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपचे किरण कोलते हे विजयी झालेले असून त्यांना एकूण 2951 मध्ये पडलेली आहे. मात्र याच ठिकाणी भाजपच्या रजनी सावकारे यांना 2427 मध्ये पडलेली असून त्यामानाने 504 मते त्यांना कमी पडलेली आहे. तर याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळें यांना एकूण 1700 मते पडलेली आहे. हे मंत्री संजय सावकारे यांचे होमपीच मानले जाते.
4) प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या प्रभागात दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून आलेले आहे.भाजपच्या रजनी सावकारे यांना एकूण 1700 मते पडलेली असून गायत्री भंगाळे यांनी आश्चर्यकारकरित्या 435 मतांची आघाडी घेऊन एकूण 2135 मिळवलेली आहे, जी राष्ट्रवादीच्या या प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारापेक्षाही 489 मतांनी जास्त आहे.
5) प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा नगरसेवक पदाचाही उमेदवार नसताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळें यांना तब्बल 1009 मते मिळालेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गिरीश महाजन आणि पूजा प्रेमचंद तायडे हे दोन्ही भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत.
एकूण 25 प्रभागांपैकी राष्ट्रवादीने 12 प्रभागांत, तर भाजपने 13 प्रभागांत आघाडी घेतली असली तरी, भाजपच्या बालेकिल्ल्यातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांना कमी मतदान झाल्याने आणि एकूण मतसंख्येत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुढे राहिल्याने गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. मात्र लेवा पाटीदार समाजाचा या निवडणुकीच्या मतदानावर थेट प्रभाव दिसून आलेला असून , त्याचाच प्रभावी परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.













