जळगाव -अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज त्यांच्या सहकुटुंब त्यांच्या अमळनेर तालुक्यातील मूळ गावी हिंगोणे खु. येथे त्यांच्या आई व पत्नी यांचे सह मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
त्यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेचा पारा कमी झालेला असून काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तलेला असला, तरीही जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील मतदारांना केलेले आहे.