बालकाचा खुन करून पलायन केलेले २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन ३६ तासांत जेरबंद

जळगाव ,दि-१८/०६/२५, गजानन नामदेव महाजन रा.रिंगणगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव यांनी दिनांक १६ जून रोजी एरंडोल पोलीस स्टेशन येथे तकार दिली होती की, त्यांच्या १४ वर्षीय मुलास ०७.३० वा. सुमारास त्यांचे राहते घरून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्टेशन येथे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तत्परता दाखवुन गावातील लोकांचे मदतीने गाव परिसरात शोध मोहिम राबवली होती. त्याप्रमाणे गावबाहेरिल रिंगणगाव खर्चे रोडलगत असणा-या पडक्या शेतात एका काटेरी झाडाझुडपात तेजस चा मृतदेह ग्रामस्थांना मिळुन आला होता. सदर मृतदेहाची पाहणी केली असता, त्याचे गळयावर कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जख्मी करून जिवे ठार मारले होते. सदर घटनेमुळे रिंगणगाव व आजुबाजुचे परिसरात भितीचे तसेच असुरक्षिततेचे वातावरण गावक-यांमध्ये निर्माण झाले होते. सदर ग्रामस्थांनी रास्ता रोको व महामार्गावर येवुन निदर्शने सुध्दा केले होती. त्यावेळी ग्रामस्थानी सदर अज्ञात आरोपीतांचा शिघ्रतेने तपास करून शोध घेणे बाबत निवेदन केले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता सदर संवेदनशिल गुन्हात आरोपीतांनी कु तेजस चा खून करतांना कोणताही पुरावा ठेवेलेला नव्हता. तसेच खुन करतांना आरोपीतांना कोणीही पाहिले नव्हते. त्यामुळे पोलीसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहीले होते.
सदर गुन्हयाचे स्वरूप पाहता, पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी तसेच अपर पोलीस अधीक्षक, जळगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवुन पाहणी करून प्रभारी अधिकारी एरंडोल निलेश गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांना आरोपी शोधाबाबत मार्गदर्शन पर सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे एरंडोल पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कु. तेजस महाजन हा सायंकाळी गावात कुठे कोणासोबत गेला याबाबत शोध घेण्यास सूरू केली. तेजस चे आजुबाजुला फिरणारे सर्व इसमांची ओळख पटवुन सर्वांकडे सखोल विचारपुस करण्यात आली परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणून तेजसचा मृतदेह ज्या ठिकाणी मिळुन आला. त्या शेतात जावुन पुन्हा आरोपीतांचा माग काढणेकामी पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी सो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली. तेजसचा मृतदेह ज्या शेतात मिळुन आला त्यापासुन ५० फुट अंतरावर राहणारे व मध्यप्रदेश खरगोण परिसरातुन शेतीकामासाठी आलेले काही कुटुंबाकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. चौकशी अंती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, तेथे वास्तव्यास असलेले हरदास वास्कले रा. नांदीया ता. भगवानपुरा जि. खरगोण मध्यप्रदेश हा पत्नी समिता व मुलांसोबत कामानिमित्त व त्याचे बाजुला राहणारा सुरेश खरते रा धोपा ता. झिरण्या जि खरगोण मध्यप्रदेश हा एका सदर नातेवाईकाचे लग्नासाठी आज सकाळीच मोटारसायकलवर रवाना झालेले आहेत.
सध्या पेरणीचे दिवस असतांना ,सदर संशयीत इसम हे मालकांना न सांगता निघुन गेल्याने त्याचेवर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचेवर संशय बळावला. सदर इसमांबाबत पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी सो. यांना माहिती दिली असता, आरोपीतांचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांची ३ पथके रवाना केली. संशयीत इसम हरदास वास्कले रा. नांदीया ता भगवानपुरा जि. खरगोन मध्यप्रदेश हयाचे पोलीस अधिक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले गौरव पाटील यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने शोध घेतला असता, सदर इसम हा फैजपुर – रावेरमार्गे जात असतांना दिसता पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेबांना तात्काळ महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमावर्ती भागात नाकाबंदी लावणेकामी फैजपुर व रावेर पोलीस स्टेशनचे आदेशित केले. त्याप्रमाणे मोताळे सहा.पो.निरीक्षक नेम फैजपुर यांनी भुसावळ – फैजपुर नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्याण संशयीत इसम हरदास वास्कले हा मोटार सायकलवर येतांना दिसला, त्यास पळुन जाण्याची संधी न देता त्यास शिताफीने ताब्यात घेतले. संशयीत इसम हरदास वास्कले यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप-निरीक्षक सोपान गोरे व सोबतचे कर्मचारी पोना श्रीकृष्ण देशमुख सफौ रवि नरवाडे पोहवा संदिप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टाकळे, पोकॉ बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, महेश सोमवंशी यांनी ताब्यात घेवुन वेगवेगळी कौशल्य वापरून सखोल विचारपुस केली असता, सदर आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली देवुन माहिती सांगितली की, त्याचे शेजारी राहणारा सुरेश खरते व गावातील राहणारा रिचडीया कटोले हे गावात फिरत असतांना समोरून येणारा मयत तेजस महाजन यास सुरेश वस्कले याचा धक्का लागल्याने, त्यावरून सुरेश वस्कले याने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. तो विरोध करत असतांना तिघांनी त्यास मारहाण करून, रिचडीया कटोले यांने त्याचेकडील चाकुने त्याचे गळयावर वार करून गंभीर जख्मी करून ठार केले. कोणीही आपल्याला पाहिले नाही, असे पाहताच तेजसला सर्वांनी उचलुन सुरेशने खांद्यावर उचलुन नेवुन आडमार्गाने त्यांचे झोपडयांचे बाजुला असणा-या शेतात काटेरी झाडाझुडपांत नेवुन ठेवले. तसेच आपल्याला सदर प्रकार करतांना कोणीही पाहीले नाही म्हणुन वाच्यता न करता कमालिची गुप्तता पाळली. सदर आरोपीतांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पो उपनिरी श्री शरद बागल, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, विष्णु बि-हाडे, संदीप पाटील प्रविण मांडूळे राहुल कोळी किशोर पाटील, पोकॉ प्रदीप चवरे, विलेश सोनवणे पोहवा दामोदरे,, रविंद्र पाटील अश्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी सुरेश खरते रा धोपा ता. झिरण्या जि. खरगोण मध्यप्रदेश याचा माग घेत त्यास धुपा, ता. झिरण्या, ता. भगवानपुरा जि खरगोण येथुन डोंगरवस्तीतून भंगारघाटी धुपा गावी जवळपास १० किमी पायी जावुन ताब्यात घेतले सदर आरोपीतांची एकत्र तपासणी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांचा तिसरा साथिदार रिचडीया कटोले याचे शोधकामी सहा. पो. निरी डोमाळे व कर्मचारी यांचे पथक रवाना करण्यात आलेले आहे. तरी सदर ताब्यात आरोपीतांना एरंडोल पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व स्टाफ करत आहे.
पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी सो, तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव श्रीमती कविता नेरकर मॅडम, पोलीस उप-अधीक्षक, अमळनरे श्री. सागर कोते, पोलीस उप-अधीक्षक, चोपडा श्री. अण्णासाहेब घोलप, पोलीस उप-अधीक्षक, चोपडा श्री केदार बारबोले यांचे मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिल अधिकारी व कर्मचारी यांनी ३६ तासांचे अथक परिश्रम करून उघडकीस आणला आहे.













